---Advertisement---

चंद्रशेखर बावनकुळेंनी मागितली रामदास आठवलेंची माफी

By team
On: December 16, 2024 7:37 PM
Follow Us:
---Advertisement---

नागपूर, वृत्तसंस्था 

 

काल मंनागपुरात नव्या मंत्र्यांच्या शपथग्रहन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे काही अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू झालं असून रामदास आठवले देखील नाराज आहेत. त्यांनी देखील दोन मंत्रिपदाची मागणी केली होती.

दरम्यान या सर्व घडामोडीवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच रामदास आठवले यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रण वेळेत न पोहोचल्यानं त्यांनी आठवले यांची माफी देखील मागितली आहे.

‘मी रामदास आठवले यांची माफी मागतो. त्यांना गडबडीत मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रण वेळेत पोहचले नाही. आमच्याकडून चूक झाली आहे’.  तसेच  मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे, कोणाला नाही, हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. छगन भुजबळ यांना भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीमध्ये चांगलं स्थान मिळेल. सुधीर मुनगंटीवार आणि इतरांची मंत्रिपदावरुन कोणतीही नाराजी नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांच्या पक्षातील नाराजांची नक्कीच समजुत काढतील. घराणेशाहीचा आरोप योग्य नाही. ज्यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले आहे हे त्यांच्या कर्तृत्वाने मिळाले आहे. घराणेशाही मुळे मिळालेले नाही, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!