ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक लोकसभेत स्वीकारले

नवी दिल्ली वृत्तसंस्था 

 

‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक आज संसदेत लोकसभेमध्ये मांडण्यात आले. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी घटनेतील 129 संशोधन विधेयक 2024′ लोकसभेत मांडले. या विधेयकावर इलेक्ट्रॉनिक्स वोटींग मशीनने मतदान घेण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 220 आणि विरोधात 149 मते पडली. एकूण 369 सदस्यांनी मतदान केले. यानंतर विरोधी सदस्यांनी गोंधळ घातला. या प्रक्रियेवर आक्षेप घेतला.

त्यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी आक्षेप असेल तर मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचे सांगितले. यावर लोकसभेचे अध्यक्ष म्हणाले की, आम्ही आधीच सांगितले होते की, जर एखाद्या सदस्याला तसे वाटत असेल तर तो मतपत्रिकेद्वारे त्याचे मत देऊ शकतो. त्यानंतर मतपत्रिकेवर मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी इलेक्ट्रॉनिक मतदानाची प्रक्रिया सांगितली. त्यांनी म्हटले, तुम्ही जेव्हा मतदान करतात तेव्हा चुकून बटन दाबले गेले असेल तर मतपत्रिकेद्वारे तुम्ही ती चूक दुरुस्त करु शकतात. लोकसभेचे सेक्रेटरी जनरल तुमची पूर्ण व्यवस्था करेल. कारण अनेक खासदार नवीन आहेत. ते पहिल्यांदाच संसदेत आले आहेत.

 

लोकसभेची कारवाई स्थगित

मतपत्रिकेवर मतदान झाल्यानंतर लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांना निकाल सांगितला. त्यांनी सांगितले प्रस्तावाच्या बाजूने 269 तर विरोधात 198 मते पडली. त्यानंतर कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी विधेयक लोकसभेत मांडले. त्यानंतर लोकसभेची कारवाई दुपारी तीन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!