सोलापूर, वृत्तसंस्था
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, सोलापूर अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिशियन, वायरमन, कॉम्प्युटर ऑपरेटर” पदाच्या 180 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 आहे.
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिशियन, वायरमन, कॉम्प्युटर ऑपरेटर)
पदसंख्या – 180 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – सोलापूर
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in
या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
सर्व प्रथम शिकाऊ उमेदवाराने संगणकीय प्रणालीमध्ये Online Apprenticeship Registration करावे.
चुकीचे व अपूर्ण माहिती भरलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.