ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात थंडीची लाट कायम, कुठे घसरला पारा..

सोलापूर, वृत्तसंस्था 

राज्यात थंडीची लाट कायम असून मागील दोन ते तीन दिवसांपासून पारा कमालीचा घसरलाय. अनेक ठिकाणाचे कमाल आणि किमान तापमान घसरलेय. जम्मू काश्मीर, मानालीपेक्षाही महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान कमी होतं. ठिकठिकाणी शेकोट्या पेटवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्याचा पारा १० अंशाच्या खाली घसरल्याने हुडहुडी वाढली आहे. धुळ्याचा पारा मागील तीन दिवसांपासून पाच अंशाच्या आसपास राहिलाय. धुळे येथील कृषी महाविद्यालयात सलग दुसऱ्या दिवशी राज्याचे हंगामातील नीचांकी ४ अंश तापमान नोंदले गेले. राज्यात तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता कायम आहे.

 

राज्यात कुठे किती तापमान?

धुळे – 5° सेल्सिअस

परभणी – 6.1° सेल्सिअस

दापोली – 7.8 ° सेल्सिअस

यवतमाळ – १०° सेल्सिअस

नांदेड 11° सेल्सिअस

अमरावती – 13°सेल्सियस

सोलापूर -14 ° सेल्सिअस

पालघर – 19 ° सेल्सियस

 

यवतमाळ जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने घट होत असून सर्वात कमी 10 अंश तापमानाची नोंद करण्यात आलीय. या आठवड्यात तीन अंसाने तापमान खाली आले आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे या थंडीच्या लाटेमुळे वृद्ध व मुलांमध्ये कपाचे आजार वाढले असून थंडी वाढत असल्याने प्रशासनाकडूनही नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे ग्रामीण भागात तर हवेमुळे थंडीचा कडाका आणखीनच जोर पकडत आहे.

 

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पारा घसरत आहेत.अशात वाढत्या थंडीतही रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरीवर्ग रात्री-बेरात्री आणि भल्या पहाटे सिंचन करण्यासाठी घराबाहेर पडताहेत.त्यामुळे सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी होताहेत. रत्नागिरीमधील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे दापेली शहरही गारठले आहे. दापोली किमान तापमान 7.8 सेल्सिअसवर असल्याची नोंद झाली. नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी घेतला शेकोटीचा आधार घेतलाय. गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची दापोलीला पसंती मिळत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!