---Advertisement---

पुण्यात तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र

By team
On: December 11, 2024 6:36 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे, वृत्तसंस्था 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे.  पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 10 हजार बहिणी अपात्र ठरल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात एकूण जिल्ह्यातील 20 लाख 84 हजार अर्जदारांना योजनेचा लाभ झाल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाने  दिली आहे.

पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 15 ऑक्टोंबर पर्यंत जिल्ह्यातून 21 लाख 11 हजार 363 अर्ज मंजूर करण्यात आले होते. बाकी अर्जांची छाननी राहिली होती.अजूनही 12 हजार अर्जाची छाननी बाकी आहे, अशी माहिती आहे. पुण्यात 9 हजार 814 अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरले आहेत तर 5 हजार 814 अर्जमध्ये किरकोळ त्रुटी सापडल्याने तात्पुरते नाकारण्यात आले आहेत. पुणे शहरातून 6 लाख 82 हजार 55 अर्ज आले. त्यातील 6 लाख 67 हजार 40 अर्ज मंजूर झाले.तर 3 हजार 494 अर्ज अपात्र ठरले आहेत.

पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त हवेली तालुक्यात सर्वात जास्त अर्ज आले. 4 लाख 19 हजार 859 अर्ज आले तर त्यातील 4 लाख 15 हजार 510 अर्ज मंजूर करण्यात आले.यातील 1 हजार 166 अर्ज अपात्र ठरले आहे. जिल्ह्यात एकूण 21 लाख 11 हजार 946 अर्ज आले. त्यातील 20 लाख 84 हजार 364 अर्ज मंजूर झाले.तर 9 हजार 814 अर्ज अपात्र ठरले.

पिंपरी-चिंववडमधून तब्बल 4 लाख 32 हजार 890 अर्ज लाडक्या बहिणींनी भरले होते. त्यापैकी 3 लाख 89 हजार 920 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या. त्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे दरमहा दीड हजार रुपयांची रक्कम त्यांना मिळाली आहे. तर, 42 हजार 486 अर्ज बाद ठरण्यात आले आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!