ध्यास विश्वसार्ह बातमीचा

झेडपी’च्या ३९४ प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसणार

सोलापूर, वृत्तसंस्था 

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी पहिल्या टप्प्यात तीन कोटी १० लाखांचा निधी मिळाला आहे. यासाठी काढलेल्या निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार ठेकेदाराकडून ३९४ शाळांमध्ये त्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू झाले असून, लवकरच कामाला सुरवात होणार आहे. त्यामुळे त्या शाळांवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. बदलापुरातील घटनेनंतर २१ ऑगस्ट रोजी राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले होते.

जिल्हा वार्षिक योजनेतून पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी तीन कोटी १० लाखांचा निधी देण्यात आला आहे. त्याच्या निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शाळा सुटीचे दिवस वगळता चार महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या एकूण दोन हजार ७७७ प्राथमिक शाळा आहेत. प्रत्येक शाळेत आठ सीसीटीव्ही बसविण्यासाठी अंदाजे ५५ कोटींची गरज आहे. मात्र, जिल्हा नियोजन समितीने त्यासाठी केवळ तीन कोटी १० लाखांचा निधी दिला आहे.

 

 

शाळांची तालुकानिहाय संख्या

उत्तर सोलापूर – २७

दक्षिण सोलापूर –  ६१

अक्कलकोट – ४४

बार्शी – २७

मोहोळ –  ५६

मंगळवेढा –  २४

पंढरपूर –  ३३

सांगोला – २२

करमाळा – २३

माढा –  २९

माळशिरस –  ४८

एकूण = ३९४

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!