सोलापूर वृत्तसंस्था
शहरातील सम्राट चौक आणि सदर बाझार येथून दोन बंद घरात चोरी करून दोन लाख ८५ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे. सम्राट चौक येथील स्वामी समर्थ हौससिंग सोसायटीमधील रहिवासी सुनिता प्रशांत अभ्यंकर (वय 54, रा. बिल्डिंग नंबर 35 प्लॉट नंबर 5 स्वामी समर्थ हौससिंग सोसायटी यांच्या घरातून एक लाख 90 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना 27 डिसेंबर रोजी घडली. त्यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
दुसऱ्या घटनेत लष्कर येथील राजेश वासुदेव पुजारी (वय 59, रा. 505 दक्षिण सदर बाझार, लष्कर) यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप आणि तांब्याची भांडी असा 95 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना 27 डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी सदर बाझार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.