ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्राजक्ता माळीकडून सुरेश धसांचे कौतुक

मुंबई वृत्तसंस्था 

 

आमदार सुरेश धसांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीबाबत केलेल्या काही वक्तव्यांवर प्राजक्ताने आक्षेप घेत पत्रकार परिषद घेतली होती. तसेच तिने या पत्रकार परिषदेत तिच्यावर झालेल्या आरोपांचं खंडण केलं होतं. एवढच नाही कर राग आणि संताप व्यक्त करत तिने सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणीही केली होती. तसेच सुरेश धस यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता.

 

प्राजक्ताची ही पत्रकार परिषद चांगलीच चर्चेत आली होती. या प्रत्रकार परिषदेनंतरही धस त्यांच्या मतावर ठाम होते. त्यानी प्राजक्ताची माफी मागणार नाही हे स्पष्ट भाषेत सांगितलं होतं. मात्र यानंतर प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी भेट घेतली. या भेटीनंतर आता आमदार सुरेश धस यांनी माघार घेतली असल्याचे समोर आले आहे.

सुरेश धसांनी प्राजक्ता माळीची माफी मागत या प्रकरणावर पडदा पडला असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या नव्याने सुरू झालेल्या वादाला पूर्णविराम मिळाला असल्याचे दिसत आहे. कारण आता अभिनेत्री प्राजक्ताने देखील यूटर्न घेतला असून आता कोणतीही कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत तिने एका व्हिडीओद्वारे सुरेश धस यांचे आभार मानले आहेत.

प्राजक्ताने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे  माननीय आमदार श्री सुरेश धस यांचे देखील मी मनापासून आभार मानते अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी समस्त महिला वर्गाची माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. दादा खूप खूप धन्यवाद. असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलं. तुम्हा सगळ्यांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार सबंध महाराष्ट्र सैनिक सर्वप्रथम मनापासून आभार मानते पत्रकार परिषद घेतल्या क्षणापासून ते आत्तापर्यंत मी आणि माझे कुटुंबीयांना शेकडो फोन , कॉल मेसेजेस, सोशल मीडियावर मेसेज आले आहेत. महिलांच्या सन्मानासाठी समाजातल्या सर्व स्तरांमधून आवाज उठवला गेला पाठिंबा दिला गेला समर्थन दिले गेले त्यामुळे आम्हाला फार समाधान वाटलं खूप खूप धन्यवाद.”

असं म्हणत प्राजक्ताने या व्हिडिओमध्ये अवघ्या महाराष्ट्राचे आभार मानले. तसेच तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचेही आभार मानले. आणि या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकते असंही तिने स्पष्ट केलं आहे.

सुरेश धस आणि प्राजक्ता माळी या दोघांनीही आपापली बाजू मांडत शेवटी या वादाला पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच प्राजक्ताचा हा व्हिडीओ देखील सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या समिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!