ध्यास विश्वसार्ह बातमीचा

म्हेत्रे प्रशालेचे एकनाथ मोसलगी यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार

अक्कलकोट, वृत्तसंस्था 

 

अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे प्रशालेतील क्रीडा शिक्षक एकनाथ मोसलगी यांना जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा शिक्षक भारती संघटनेकडून आयोजित केलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोलापूर येथील जगदीश मंगल कार्यालय येथील खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे शिक्षक भारतीय अध्यक्ष अशोक बेलसरे तसेच जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काटमोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.यावेळी मोसलगी यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाल्याने म्हेत्रे प्रशालेत व श्री गुरुशांत लिंगेश्वर जुनियर कॉलेज व त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

मोसलगी  हे विद्यार्थी प्रिय शिक्षक असून क्रीडा क्षेत्रात तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांनी अनेक वेळा शाळेला घवघवीत यश मिळवुन दिले आहे. याची दखल घेत शिक्षक भारती संघटनेने दखल घेऊन आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्यायापक सिद्धाराम पाटील, रामचंद्र गद्दी, नागराज कलबुर्गी, राजशेखर पाटील, सैदप्पा मोसलगी, मारुती मोसलगी, अर्जून मोसलगी, रजाक मुल्ला, भागम्मा मोसलगी, मेघा मोसलगी, मलम्मा मोसलगी, गौराबाई मोसलगी, सोनाबाई नायकोडी, कावेरी नायकोडी , शरणबसप्पा नायकोडी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!