ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खुशखबर.. पुणे- सोलापूर रेल्वे प्रवास होणार सुसाट

सोलापूर वृत्तसंस्था 

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे.  आता पुणे – सोलापूर दरम्यानचा प्रवास सुसाट होणार आहे. रेल्वे मार्गाचे अपग्रेडेशन झाल्यानंतर पुणे-दौंड नंतर आता सोलापूर-दौंडदरम्यानच्या मार्गावरही रेल्वे गाड्या ताशी १३० कि.मी. वेगाने येत्या काही दिवसांत धावतील.  याची अंमलबजावणी लवकरच होणार असून पुणे-सोलापूर या मार्गावर रेल्वे ताशी १३० धावणार आहे. दौंड-सोलापूर-वाडी विभागांत एकूण ४४ जोड्या रेल्वे (LHB रेकसह ८८ट्रेन सेवा) सध्याच्या ११० किमी प्रतितास वरून १३० किमी प्रतितास वेगाने धावतील अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

ट्रेनचा वेग वाढल्याने प्रवाशांवर लक्षणीय परिणाम होतो. वेग वाढल्याने प्रवासाचा वेळ कमी होईल आणि प्रवासी त्यांच्या गंतव्यस्थानी जलद पोहोचू शकतात, ज्यामुळे वेळेची बचत होईल. यातूनच उत्पादकता वाढेल आणि आर्थिक फायदा होईल. यामुळे भविष्यात मागणी पूर्ण करण्यासाठी गाड्यांची संख्या वाढवण्याची संधी निर्माण होईल. जलद गाड्यांमुळे प्रवाशांचे समाधान वाढू शकते, कारण प्रवासी अधिक कार्यक्षम आणि आरामदायी प्रवासाचा आनंद घेतात. वेगवान गाड्यांमुळे इंधनाचा वापर कमी होतो, परिणामी हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होते आणि कार्बन फूटप्रिंट कमी होतो. यामुळे मध्य रेल्वे वाहतुकीच्या इतर पद्धतीपेक्षा स्पर्धात्मक फायदा मिळणे, अधिक प्रवाशांना आकर्षित करणे आणि बाजारपेठेतील हिस्सा वाढवणे शक्य होईल.

धावत्या गाड्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रवाशांना उत्तम प्रवास सोई मिळावी यासाठी, ट्रॅकची उत्तम दर्जाची देखभाल केली जात आहे. याचप्रमाणे आयुष्य कमी झालेल्या गाड्यांची, मालमत्तेची पुनर्स्थापना देखील प्राधान्याने केली जात आहे. सर्व कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या वेगावरील निर्बंधांचे आणि गाड्या सुरक्षितपणे चालवण्यासाठी वेळोवेळी लागू केलेल्या सर्व निर्बंधांचे पालन करून संबंधित अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेच्या सर्व पैलूंची आणि तांत्रिक तपासणीची खात्री केल्यानंतर गाड्यांचा वेग वाढवण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!