---Advertisement---

राज्यात दोन ते तीन दिवस थंडीचा जोर कायम

By team
On: January 5, 2025 10:35 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

उत्तरेकडील शीतलहरींमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रात तो अधिक जाणवत असून पुढील दोन दिवस तो कायम राहण्याची शक्यता आहे. धुळे येथे शनिवारी राज्यातील नीचांकी 6.8 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. नाशिकचे तापमान 10.1 तर छत्रपती संभाजीनगरचे 11.6 अंशांवर होते. पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस आणि हिमवर्षाव होत आहे. तसेच पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आगामी दोन दिवस दाट धुके राहणार असून तेथील वातावरणाचा परिणाम राज्यावर होत आहे. दोन दिवसांनंतर काहीशी थंडी कमी होणार असल्याचे सांगण्यात आले.

पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रामध्ये थंडीचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार धुळे राज्यातील सर्वात निचांकी तापमान नोंद होण्याची शक्यता आहे. धुळ्यात 6.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर त्यानंतर निफाड अहिल्यानगर, पुणे, जळगाव, नागपूर, गोंदिया येथील पारा देखील दहा अंशाच्या खाली उतरला आहे. काही ठिकाणी धुक्यासह दव देखील पडल्याचे दिसून आले आहे. अशीच परिस्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार असल्याची शक्यता हवामाना विभागाने वर्तवली आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील काळी भागात देखील थंडीचा जोर वाढला आहे. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी याशिवाय विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, भंडारा आणि नागपूर मध्ये पारा दहा अंशाच्या जवळपास राहिला आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये 11.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे तर नागपूर मध्ये 9.0 अंश तापमान नोंदवण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!