ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘2 कोटी दे, अन्यथा तुझे हातपाय तोडीन’

वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या

बीड, वृत्तसंस्था 

 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातून अनेक गुन्हेगारीच्या घटना उघड होताय. आता मस्साजोग येथील खंडणीप्रकरणात मोठा पुरावा तपास यंत्रणेच्या हाती लागला आहे. एक फोन कॉलने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत.

आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. मागणी पूर्ण न झाल्यास हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावण्याची धमकी वाल्मीक कराड याने दिल्याचा आरोप करण्यात येत होता. तपास यंत्रणेला असे एक कॉल रेकॉर्डिंग मिळाले आहे. सीआयडी या आवाजाचा नमुना तपासणार आहे. हा आवाज वाल्मीकचाच आहे का, याची खातरजमा करण्यात येत आहे. हे सॅम्पल जर जुळले तर कराडच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

सुनील शिंदे हे आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडे केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम आहे. 29 नोव्हेंबर 2024 रोजी शिंदे यांच्या मोबाईलवर विष्णू चाटे याने फोन केला. त्याने वाल्मिक अण्णा बोलणार असल्याचे शिंदे यांना सांगितले. ज्या परिस्थितीत सुदर्शनने सांगितले आहे, त्या परिस्थितीत काम बंद करा. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील. काम चालू केले तर याद राखा, असे म्हणून त्या इसमाने शिंदे यांना धमकावले.

तर त्याच दिवशी सुदर्शन घुले आवादाच्या साईटवर पोहचला. काम बंद करा, नाहीतर तुमचे हातपाय तोडू. काम सुरू ठेवायचे असतील तर दोन कोटी रुपये द्या असे त्याने सांगितले. यासंबंधीचे सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदे यांच्या मोबाईलमध्ये झाले. हेच रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागले आहे. त्यातील आवाज कराडचा असल्याचा दावा करण्यात येत होता. त्यामुळे कराडचा आवाजाचा नमुना तपासासाठी घेण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!