---Advertisement---

अक्कलकोटचा डिके सुपर लीग राष्ट्रवादी चषक विनर्स वॉरियर्सने पटकावला

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२७ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिलीपभाऊ सिद्धे युवामंच व आपुलकी सामाजिक बहुद्देशीय संस्थेतर्फे आयोजित डिके सुपर लीग राष्ट्रवादी चषक विनर्स वारीयर्स
संघाने पटकावला.या स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला.ही स्पर्धा एकूण तेरा दिवस चालली.या स्पर्धेत दहा संघ
सहभागी झाले होते.अंतिम सामन्याचा
प्रारंभ विश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे
माजी युवक जिल्हाध्यक्ष विक्रांत माने, तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष माणिक बिराजदार,रिपाईचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे, शिवराज स्वामी,राम जाधव, राहुल किरन्नळी, महादेव वाले आदींची उपस्थिती होती. अंतिम सामना एसएस इलेव्हन व विनर्स वारीयर्स या संघामध्ये झाला.हा सामना विनर्स वारीयर्सने जिंकला.विजेत्या विनर्स वोरियर्स संघाला प्रथम बक्षिस ५१ हजार रुपये व राष्ट्रवादी चषक देऊन सन्मान करण्यात आला.द्वितीय बक्षीस ३१ हजार रुपये व राष्ट्रवादी चषक देऊन एसएस इलेव्हनचा सन्मान करण्यात आला.तृतीय बक्षीस २१ हजार व राष्ट्रवादी चषक रायगड रॉयल संघाला देण्यात आला. पंच म्हणून सोन्याबापू पवार व अंकुश
पवार यांनी काम पाहिले.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अविराज सिध्दे, मुन्ना राठोड, सुहास सुरवसे,श्रीशैल चितली, बंटी पाटील,रोहित मडिखांबे,प्रभु देवर, रशिद खिस्तके, अनिल माने,अमोल घोटकर,दर्शन चव्हाण,सोनु सुरवसे, शिवकुमार मेनशेट्टी, सिध्दाराम पुजारी,संदीप जाधव,प्रज्वल पाटोळे, समर्थ सुतार, शिवराज जकापुरे,शिवशरण सदलगी,रवी माशाळकर,प्रणीश बनसोडे आदींनी
परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!