मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील नेहमीच आक्रमक भूमिका घेत असतांना दिसत आहे. आता पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर त्यांनी जुन्याच मागण्यासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. तर तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालवली. दीड वर्षांपासून त्यांनी मराठा आरक्षणासाठी मोठं वादळ निर्माण केलं आहे. आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीत अनेक घडामोडी घडत आहेत.
आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. जरांगे पाटलांची तब्येत खालावली, उपोषणावर तोडगा काढण्याची मागणी आता जोरू धरू लागली आहे. मयत संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख उपोषणात सहभागी होत आहे. मस्साजोग येथील महिला ही होणार आज उपोषणात सहभागी होत आहेत. आता सरकार बहुमताने आहे समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं उपोषणात सहभागी महिलांनी मागणी केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहेत. मी कालच मागणी केली आहे सरकार शिष्टमंडळ पाठवावं. सरकारने उपोषण गांभीर्याने घेतलं पाहिजे लवकरात लवकर शिष्ट मंडळ पाठवून यावर निर्णय घेतला पाहिजे. आज उपोषणात वैभवी सहभागी होणार आहे आईची तब्येत ठीक असेल तर आई पण सहभाग घेणार आहेत, असे धनंजय देशमुख म्हणाले.