---Advertisement---

नववर्षाच्या प्रारंभी अक्कलकोटकरांना मिळणार नवा मुख्याधिकारी !

Follow Us:
---Advertisement---

 

 

अक्कलकोट, दि.३१ : नववर्षाच्या प्रारंभी अक्कलकोटचे नवे मुख्याधिकारी म्हणून सचिन पाटील यांची नियुक्ती करण्यात
आली आहे.
पाटील हे सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून काम केले आहेत. तिथून ते अक्कलकोट नगरपरिषदेत प्रशासकीय कारणास्तव रिक्त पदावर त्यांची बदली करण्यात आली
आहे.कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणाच्या कामकाजाचे गांभीर्य व गरज लक्षात घेऊन त्याबाबतच्या उपाय योजनांचा भाग म्हणून सदर आदेश निर्गमित करण्यात येत असल्याचे अवर सचिवानी या आदेशात म्हटले आहे. पाटील यांना तेथून ३१ डिसेंबर रोजी कार्यमुक्त करण्यात येत असल्याचेही म्हटले आहे. १ जानेवारी रोजी रुजू होऊन त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे नव्या वर्षाच्या प्रारंभीच अक्कलकोटकराना नवे मुख्याधिकारी मिळाले आहेत.मुख्याधिकारी गणेश शिंदे यांची बदली श्रीरामपूर येथे झाल्यानंतर नवे मुख्याधिकारी कोण याबाबतची चर्चा सुरू झाली होती.त्याला अखेर आता पूर्णविराम मिळाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!