---Advertisement---

अक्कलकोट तालुक्यात एमआयएम पक्ष निवडणुकीत ताकद दाखवेल, फारूक शाब्दी यांची घोषणा

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट,दि.१ : आगामी सर्व निवडणुकात एमआयएम पक्ष सर्व तयारीनिशी आपली ताकद दाखवेल,
असा दावा एमआयएमचे जिल्हाध्यक्ष हाजी फारूकभाई शाब्दी यांनी केला.
अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत करण्यासाठी अक्कलकोट शहर आणि तालुकास्तरीय मेळावा पार पडला.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी नुतन कार्यकारणी निवड प्रक्रिया पार पडली. पुढे बोलताना शाब्दी म्हणाले,आगामी सर्व नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसह इतर सर्व निवडणुकात एमआयएम पक्ष भाग घेईल.आज पर्यंत मुस्लिम समाजाचा वापर केवळ मतदाना पुरता केला गेला.यापुढे मुस्लिम समाजाशिवाय कोणालाही सत्तेवर येता येणार नाही,अशी ताकद निर्माण करणार आहोत. प्रत्येक घरा घरा पर्यंत जाऊन एमआयएम पक्षाच्या माध्यमातून गोर गरिबांच्या हितासाठी, कल्याणासाठी केलेल्या चांगल्या कामाची आठवण जनतेला करून देणार असल्याचे यावेळी
शाब्दी यांनी सांगितले.या मेळाव्यात अक्कलकोट तालुका ए आय एम आय एम पक्षाचा नुतन अध्यक्षपदी अतिक बागवान, तालुका युवक अध्यक्षपदी सैपन हगलदिवटे, अक्कलकोट शहर अध्यक्षपदी इरफान दावण्णा,शहर युवक अध्यक्षपदी सैपन शेख यांची निवड करण्यात आली.या बैठकीला मौला पठाण, अकिब बागवान, इसाक अत्तार, हुसेन बळोरगी,पालेखान, अश्पाक सय्यद, आरिफ शेख, तैयब शेख, मदार मकानदार, इसाक अत्तार, इब्राहीम सुतार, अजीज शेख, रहिमान अत्तार, जुबेर फुलारी, अहमद कुरेशी यांच्यासह एमआयएम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!