मुंबई : वृत्तसंस्था
अनेक व्यक्तीना नॉनव्हेज खाणे खूप आवडत असते. पण अनेकदा हे नॉनव्हेज खात असतांना दुर्घटना देखील घडल्याचे समोर आले आहे. नुकतेच मुंबई शहरातील कुर्ल्यातील एका तीस वर्षीय तरुणाला चिकन बिर्याणी खाणे इतके महाग पडले की त्याच्या घशात अडकलेले चिकनचे हाड काढण्यासाठी चक्क तीन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.
घशात गेलेले हाड तरुणाच्या नाकाच्या मागील बाजूस आढळले. डॉक्टरांनी घशातील हाड काढण्यासाठी मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र हाड काही सापडले नाही. एक्स रे, सिटीस्कॅन आणि दुर्बिणीने तपासणी केल्यानंतर नाकाच्या मागील भागात हाड आढळून आले आणि तब्बल साडेआठ तासानंतर तरुणाच्या नाकामागील हाड काढण्यात डॉक्टरांना यश आले. कुर्ल्यातील तरुण घशात सूज आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तपासणीसाठी नाक, कान, घसा विकार तज्ज्ञ डॉ. संजय हेलाळे यांच्याकडे गेला होता. तपासणीत चिकनच्या हाडाचा तुकडा त्याच्या घशात अडकल्याचे आढळून आले.