मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या दोन आठवड्यापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ होत असंताना आता सोन्याच्या किंमतीत तुफान आले होते. सोने चार दिवसात 2000 रुपयांनी वधारले होते. सोमवारी सोने 550 रुपयांनी, मंगळवारी 330 रुपयांनी भाव वधरला. तर बुधवारी सोन्याने 700 रुपयांची मुसंडी मारली. गुरूवारी 400 रुपयांनी दर वधारले. तर शुक्रवारी सोने 640 रुपयांनी आपटले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर आज सकाळच्या सत्रात सोने पुन्हा कुरघोडी करण्याचे संकेत मिळत आहेत.
5 फेब्रुवारी रोजी 1000 रुपयांनी तर 14 फेब्रुवारी रोजी हजाराची वाढ चांदीने नोंदवली होती. तेव्हापासून चांदीत नरमाईचे धोरण दिसले. तर काल 100 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,300 रुपये इतका आहे.
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,092, 23 कॅरेट 85,747, 22 कॅरेट सोने 78,860 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,569 रुपये, 14 कॅरेट सोने 50,364 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 97,147 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.