पुणे : वृत्तसंस्था
पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी उघडकीस येत असतांना आता अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १८ वर्षांच्या तरुणाचा अत्यंत निर्घूणपणे खून करण्यात आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तरुणाचे हात पाय कट करून शीर आणि धड वेगवेगळ्या विहिरीत फेकून देण्यात आले होते. या भयानक हत्याकांडातील मूतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरती असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे दोन दिवसापूर्वी एका विहिरीत हात पाय आणि शीर कट केलेल्या अवस्थेतील एक धड आढळून आले होते. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. या तपाासात पोलिसांनी ६ मार्चला शिरूर येथे बारवीच्या पेपरसाठी आलेल्यानंतर मिसिंग झालेल्या माऊली गव्हाणे या १८ वर्षांच्या तरुणाच्या अनुषंगाने तपास केला. या तपासात पोलिसांच्या हाती मोठी माहिती लागली.
दाणेवाडी गावातील दुसऱ्या गावात एका विहीरीत शीर आणि हात पाय आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. दोन वेगवेगळ्या विहिरींमध्ये आढळलेले शीर आणि धड याची ओळख पटली असून हे एकाचेच असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. माऊली गव्हाणे या 18 वर्षीय तरुणाचाच हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले आहे. बारावीत शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षाच्या तरुणाची इतक्या भयानकपणे खून करण्यात आल्याच्या घटनेने पोलिसही चक्रावले असून या हत्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.