---Advertisement---

चार आठवड्यानंतर पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ ; जाणून घ्या नवा दर

On: January 6, 2021 12:00 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : जागतिक बाजारातील कच्च्या तेलातील तेजीचा वाढता दबाव लक्षात घेत पेट्रोलियम कंपन्यांनी अखेर दरवाढीचा निर्णय घेतला. आज बुधवारी देशभरातील प्रमुख शहरात पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली.

आज पेट्रोल २६ पैशांनी महागले तर डिझेल दरात २५ पैसे वाढ झाली आहे. आजच्या दरवाढीने मुंबईत पेट्रोल ९०.६० रुपये झाले आहे. तर एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना ८०.७८ रुपये मोजावे लागतील.

दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८३.९७ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७४.१२ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८६.७५ रुपये असून डिझेल ७९.४६ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.४४ रुपये असून डिझेल ७७.७० रुपये आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८६.७९ रुपये असून डिझेलचा भाव ७८.५९ रुपये आहे.

कंपन्यांनी सलग २९ दिवस इंधन दर स्थिर ठेवले. याआधी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात तब्बल ४८ दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. त्यानंतर २० नोव्हेंबरपासून १५ वेळा इंधन दरवाढ झाली. ज्यात पेट्रोल २.५५ रुपयांनी महागले. तर याच कालावधी १२ वेळा डिझेल दरवाढ झाली. ज्यात डिझेलचा भाव ३.४१ रुपयांनी वधारला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!