---Advertisement---

भंडारा दुर्घटनेतील मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत

On: January 9, 2021 11:45 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणारी घटना भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात घडलीय. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या दक्षता विभागाला ( SNCU) लागलेल्या आगीत दहा चिमुकल्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, या हृदयद्रावक घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी सकाळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी माहिती घेण्याबरोबरच घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

 


दरम्यान, या घटनेबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे.या कुटुबियांच्या दु:खात मी सहभागी असून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची मदत देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!