मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून आज सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. त्याआधी २९ दिवस कंपन्यांनी इंधन दरात कोणातही बदल केला नव्हता.
दररोज सहा वाजता बदलतात दर
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी सहा वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर काय आहेत, या आधारे पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.
देशातील विविध शहरांतील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
>> दिल्ली- पेट्रोल 84.20 रुपये आणि डिझेल 74.38 रुपये लीटर
>> मुंबई – पेट्रोलचे दर 90.83 रुपये आणि डिझेल 81.07 रुपये लीटर
>> कोलकाता – पेट्रोल 85.68 रुपये आणि डिझेल 77.97 रुपये लीटर
>> चेन्नई – पेट्रोल 86.96 रुपये आणि डिझेलचे दर 79.72 रुपये लीटर
>> बंगळुरु – पेट्रोल 87.04 रुपये आणि डिझेल 78.87 रुपये लीटर
>> नोएडा- पेट्रोल 84.06 रुपये आणि डिझेल 74.82 रुपये लीटर
>> गुरुग्राम- पेट्रोल 82.39 रुपये आणि डिझेल 74.97 रुपये प्रति लीटर
>> लखनऊ – पेट्रोल 83.98 रुपये आणि डिझेल 74.74 रुपये प्रति लीटर
>> पाटणा- पेट्रोल 86.75 रुपये आणि डिझेल 79.51 रुपये प्रति लीटर