---Advertisement---

दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! बोर्ड परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

On: January 12, 2021 10:51 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी काही दिलासादायक बातमी आहे. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज भरण्यास २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे राज्य मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये घेण्यात येणार्‍या दहावी परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरून ऑनलाईन पद्धतीने भरण्यास २३ डिसेंबरपासून सुरूवात झाली. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे यासारख्या शहरातील शाळा अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात अर्ज भरण्यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे.

 

www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर कॉलेजमधील जनरल रजिस्टरशी माहिती पडताळून खात्री करून घ्यावी, त्यानंतरच अर्ज सादर करण्यात यावा, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!