---Advertisement---

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारचा भीषण अपघात ; पत्नीचा मृत्यू

On: January 12, 2021 11:38 AM
Follow Us:
---Advertisement---

अंकोला : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात ते जखमी झाले असून त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. अपघातात त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा देखील मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोलाजवळ हा अपघात झाला आहे.

 

जखमी झालेल्या नाईक यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन केला आहे. नाईक यांच्यावर गोव्यात योग्य उपचार करण्यात यावे, अशी सूचना मोदींनी मुख्यमंत्री सावंत यांना केली आहे. पुढील उपचारासाठी नाईक यांना गोव्याला हलविण्यात आलं आहे.

 

श्रीपाद नाईक पत्नीसह देवदर्शनासाठी गेले होते. काल त्यांनी धर्मस्थळ आणि कोल्लुर येथील मंदिरात पूजा केली. येलापूर येथील गणपतीचे दर्शन घेतले. त्यांनर ते गोकर्ण येथे जाणार होते. गोकर्ण येथे ते सकाळी पूजा करणार होते. त्यानंतर ते गोव्याला येणार होते. सोमवारी सकाळी 7-7.30 च्या दरम्यान त्यांचा कारचा भीषण अपघात झाला. कारमध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नीसह चार व्यक्ती होते.  दरम्यान, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारला अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!