---Advertisement---

महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख व अधिकारी महासंघाच्या सोलापूर जिल्हयाच्या जिल्हाध्यक्ष पदी श्री लक्ष्मण वाघमोडे यांची निवड

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, प्रतिनिधी : केंद्रप्रमुख व अधिकारी संवर्गाच्या हक्कांचे संरक्षण, सेवाविषयक प्रश्नांची प्रभावी मांडणी, प्रशासकीय अडचणींचे निराकरण आणि संघटनात्मक बळकटीकरण या उद्दिष्टांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख व अधिकारी महासंघाच्या सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची रचना पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या अध्यक्षांसह नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून महासंघाचे कार्य अधिक व्यापक, सक्षम आणि परिणामकारक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

सदर जिल्हा कार्यकारिणीची रचना महासंघाचे राज्याध्यक्ष आदरणीय राजेंद्र खैरनार सर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या प्रक्रियेत कोल्हापूरचे निरीक्षक संजय भोसले यांनी निरीक्षक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन व समुपदेशन करून अतिशय समन्वयपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात कार्यकारिणीची रचना पूर्ण करण्यास सहकार्य केले. तसेच सोलापूर जिल्ह्याचे राज्य सदस्य तथा राज्य कोषाध्यक्ष विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यकारिणी गठित करण्यात आली.

महासंघाच्या सोलापूर जिल्हा कार्यकारिणीमध्ये राज्य प्रतिनिधी म्हणून विलास पाटील, विभाग प्रतिनिधी म्हणून विशाल शहाणे, जिल्हाध्यक्ष म्हणून लक्ष्मण वाघमोडे, सरचिटणीस म्हणून अरुण राठोड यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी मनोज नांदवटे, राजाराम सुडके, सुहास चवरे व दादासाहेब खराटे, जिल्हा मार्गदर्शक म्हणून महेश गोडगे, कार्याध्यक्ष म्हणून नितीन कस्तुरे, सहसचिव म्हणून अतुल शिंदे, प्रसिद्धी प्रमुख म्हणून विजय बबलेश्वर, कोषाध्यक्ष म्हणून सुनील खांडेकर, जिल्हा प्रवक्ता म्हणून अमोल शिंदे आणि जिल्हा संघटक म्हणून बालाजी जाधव यांचा समावेश आहे.

महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून शकुंतला पालके मॅडम, तर उपाध्यक्षा म्हणून श्रीमती वैशाली महाजन मॅडम यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील तालुका अध्यक्षांमध्ये अक्कलकोट – समीर कुलकर्णी, बार्शी – कालिदास पाटील, करमाळा – भाऊसाहेब जाधव, माढा – अशोक ढोबळे, माळशिरस – धनाजी वाघमोडे, मंगळवेढा – विशाल जाधव, मोहोळ – अमोल सुरवसे, उत्तर सोलापूर – सुहेल नाईक, पंढरपूर – प्रकाश सातव, सांगोला – राहुल चंदनशिवे आणि दक्षिण सोलापूर – सरफराज सर यांचा समावेश आहे.

संघटनेची ताकद ही पदांमध्ये नसून परस्पर विश्वास, सहकार्य आणि एकजुटीत असते. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी महासंघाच्या ध्येयधोरणांशी एकनिष्ठ राहून संवर्गाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवावा, शासनस्तरावरील पाठपुराव्यास सहकार्य करावे आणि संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नूतन जिल्हाध्यक्ष श्री लक्ष्मण वाघमोडे यांनी केले.

सोलापूर जिल्ह्यातील महासंघाचे कार्य अधिक सक्षम, प्रभावी आणि व्यापक करण्यासाठी सर्व पदाधिकारी एकत्रितपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!