---Advertisement---

सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा!

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, प्रतिनिधी : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणित सहकार विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. बँकेच्या १९ पैकी १८ जागांवर सहकार विकास पॅनलने विजय मिळवत निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र, माळशिरस मतदारसंघातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवत मोहिते पाटलांनी आपला गड राखला आहे.

या निवडणुकीत भाजपप्रणित सहकार विकास पॅनलसमोर मोहिते पाटलांच्या स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलचे आव्हान होते. निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेची लढत बँक व पतसंस्था मतदारसंघातून मनीष देशमुख आणि शिवसेना शिंदे गटाचे अमोल शिंदे यांच्यात झाली. या लढतीत मनीष देशमुख यांनी अमोल शिंदे यांचा २८ मतांनी पराभव केला.

सहकार विकास पॅनलचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

सहकार विकास पॅनलचे १० उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते.

१. राजेंद्र राऊत – बार्शी विकास सोसायटी
२. प्रशांत परिचारक – पंढरपूर विकास सोसायटी
३. विक्रांत (बाळराजे) पाटील – मोहोळ विकास सोसायटी
४. सिद्धेश्वर आवताडे – मंगळवेढा विकास सोसायटी
५. यशराज शिंदे – माढा विकास सोसायटी
६. श्रीदीप हसापुरे – दक्षिण सोलापूर विकास सोसायटी
७. पृथ्वीराज माने – उत्तर सोलापूर विकास सोसायटी
८. शंभूराजे जगताप – करमाळा विकास सोसायटी
९. सचिन कल्याणशेट्टी – अक्कलकोट विकास सोसायटी
१०. अजिंक्यराणा पाटील – ओबीसी मतदारसंघ

सहकार विकास पॅनलचे निवडून आलेले उमेदवार

१. बाबासाहेब देशमुख – सांगोला विकास सोसायटी
२. अर्चना घाडगे – महिला मतदारसंघ
३. शामल बागल – महिला मतदारसंघ
४. राजेंद्र बंदीछोडे – इतर भटक्या जमाती
५. रणजितसिंह शिंदे – कृषी व प्रक्रिया
६. मनीष देशमुख – बँक व पतसंस्था
७. सूर्यादित्य साळुंखे – दुग्ध विकास
८. महादेव कांबळे – अनुसूचित जाती

स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलचा एकमेव विजय

मोहिते पाटलांच्या स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलमधून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी माळशिरस विकास सोसायटी मतदारसंघातून विजय मिळवला. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार विकास पॅनलने १८ जागांवर विजय मिळवला, तर स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलला एक जागा मिळाली.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!