ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जावेद पटेल हे ध्येयाने पछाडलेले व्यक्तिमत्व : बावडे

पटेल यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

नागनहळळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत प्रयत्न करणारे आणि ध्येयाने पछाडलेले व्यक्तिमत्व म्हणजे संस्थेचे सचिव जावेद पटेल.त्यांची धडपड, चिकाटी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा पाहता, एक दिवस येथील विद्यार्थी जिल्हाधिकारी बनून त्यांचे स्वप्न पूर्ण करतील,असे गौरवोद्गार सोलापूर आकाशवाणीचे वृत्त निवेदक तथा संचारचे पत्रकार मारुती बावडे यांनी काढले.

९ ऑगस्ट रोजी शाळेत जावेद पटेल यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहन चव्हाण उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार मारुती बावडे, संस्थेचे उपाध्यक्ष जलील पटेल,बदीउज्जमा पटेल,अजीज बेन्नूर, मैनोद्दीन पटेल, खेडगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य परमेश्वर अरबाळे, प्राचार्य आय.एम.मुजावर, मुख्याध्यापक आर.जी.शेख उपस्थित होते.

 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक शंभूलिंग बशेट्टी यांनी केले. यावेळी प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने जावेद पटेल यांचा सत्कार करण्यात आला.पत्रकार मारुती बावडे यांनी त्यांना तैलचित्र भेट देऊन विशेष सन्मान केला.वाढदिवसानिमित्त पटेल यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागास प्रोजेक्टर संच भेट दिले.यावेळी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना उजळणी पुस्तक संचाचे वितरण व खाऊ वाटप करण्यात आले.

जावेद पटेल यांचे व्यक्तिमत्व असामान्य आहे. त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा  मिळत आहे,असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन चव्हाण यांनी व्यक्त केले. संगीत विभाग प्रमुख रुद्राक्ष वैरागकर आणि प्रकाश सोनटक्के यांच्यासह विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व भक्तिगीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन गुरव व मनोज जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन बसवराज बिराजदार यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!