मुंबई : सलग दोन दिवस दरवाढ केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी इंधन दर स्थिर ठेवले. देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. दिल्लीत पेट्रोल ऐतिहासिक पातळीवर पोहचले आहे. तर मुंबईत पेट्रोलचा भाव उच्चांकी पातळीच्या उंबरठ्यावर आहे. मागील १० महिन्यात कंपन्यांनी केलेल्या दरवाढीने पेट्रोल १२ रुपयांनी तर डिझेल १४ रुपयांनी महागले आहे.
दरम्यान आज इंधन दर जैसे थेच ठेवल्याने मुंबईत पेट्रोल आणि डिझेलसाठी ग्राहकांना गुरुवार इतकेच पैसे मोजावे लागतील. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९१.३२ रुपये आहे. एक लीटर डिझेलचा भाव ८१.६० रुपये आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८४.७० रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७४.८८ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८७.४० रुपये असून डिझेल ७०.१९ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८६.१५ रुपये असून डिझेल ७८.४७ रुपये आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८७.५६ रुपये असून डिझेलचा भाव ७८.४० रुपये आहे.