---Advertisement---

धारवाडजवळ टेम्पो आणि टिप्परचा भीषण अपघात ; ११ ठार, ६ जखमी

On: January 15, 2021 11:00 AM
Follow Us:
---Advertisement---

धारावड : टेम्पो ट्रॅव्हलर आणि टिप्पर यांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात धारवाडजवळ ११ पर्यटक ठार झाले आहेत, तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या तालुका रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

 

अपघातातील हे सर्वजण पर्यटक असून, ते दावणगिरीचे असल्याचे समजते. ते गोव्याकडे जात होते. पहाटे सातच्या सुमारास त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलरची धडक समोरून येणाऱ्या टिप्परशी झाली. त्यात नऊ जण जागीच ठार झाले.

 

धारवाड जिल्ह्यातील इत्तीगट्टी तालुक्यातील महामार्गावर हा अपघात झाला. धारवाड ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!