ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धनंजय मुंडे प्रकरणाला कलाटणी ; रेणू शर्माने घेतली माघार, ट्विटकरून म्हणाली…..

मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणार्‍या रेणु शर्मा यांच्यावर आता विविध राजकिय नेत्यांकडून हनीट्रेपचा आरोप केला जात आहे. भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी शर्मा या आपल्याला 2010 पासून ब्लॅकमेल करत असल्याचा खुलासा केला आहे. यानंतर मनसे नेते मनीष धुरी यांनीही सदर महिला आपल्यालाही संपर्कात होती असा गोप्यस्फोट केला आहे. तर जेट एअरवेजचे अधिकारी रिझवान कुरेशी यांनी रेणु शर्माविरोधात गंभीर आरोप केले आहे. दरम्यान, यानंतर या प्रकरणाला आश्‍चर्यकारक कलाटणी मिळाली आहे.  या सर्व प्रकारात रेणू शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व जाणीवपूर्वक केल्याचं तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मी कोणत्याही हनी ट्रॅपचा भाग नव्हते, असेही तिने यावेळी स्पष्टीकरण दिलं.

रेणू शर्माने ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘कृष्णा हेगडे यांनीच माझ्याशी बोलायला सुरुवात केली होती. ते मला आमदार प्रताप सिंह सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटले होते. त्यांनी माझ्यावर जे काही आरोप लावले आहे, ते खोटे व बिनबुडाचे आहेत. धनंजय मुंडे यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात असून समाजात माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.’

तिने पुढे असं देखील म्हटलं आहे की, कृष्णा हेगडेंनी त्यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत. त्या पुढे असंही म्हणाल्या आहेत की तुमची हीच इच्छा असेल तर मी माघार घेते. तक्रारदार रेणू शर्माने असं म्हटलं आहे की, ‘एक काम करा तुम्ही सर्वांनीच निर्णय घ्या, काहीही माहित नसूनही जे मला ओळखतात किंवा जे ओळखत नाहीत ते चुकीचा आरोप करत आहेत. तुम्ही सर्वांनी मिळून ठरवा, मी तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे माघार घेते’.


‘या प्रकरणात मी माघार घेते हीच तुमच्या सर्वांची इच्छा आहे. माझ्याबाबत सर्व मिळून जे आरोप करत आहे ते  चुकीचे आहेत. माझ्यावर जे आरोप केले जात आहे ते यापूर्वी का करीत नव्हते.  मी माघार घेत असले तरी मला माझा गर्व आहे. तुम्हाला माझ्या बद्दल कितीही आरोप करायचे आहे करा असं म्हणत रेणू शर्माने  देव तुमचं भलं करो अशा आशयाचे ट्विट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!