ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पीएमसी बँक घोटाळा ; वर्षा राऊतांनी केले ५५ लाख रुपये परत

मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं समन्स बजावल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी आपल्याकडील ५५ लाख रुपये परत केले आहेत. बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत याच्या पत्नीकडून ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज घेतले होते.  या प्रकरणी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर वर्षा राऊत यांनी हे पाऊल उचललं आहे.

वर्षा राऊत यांना डिसेंबर महिन्यात सक्तवसुली संचलनालय अर्थात ED ने नोटीस पाठवण्यात आली होती.  55 लाखाच्या व्यवहाराप्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार वर्षा राऊत यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावली होती.

ईडीच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. त्यानुसार, वर्षा राऊत यांनी एका नातलगाच्या माध्यमातून ईडीला काही कागदपत्रे सादर केली आहेत. त्यात प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्याकडून घेतलेले कर्ज परत केल्याचीही कागदपत्रे आहेत. संजय राऊत यांची निर्मिती असलेल्या ‘ठाकरे’ चित्रपटातून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी हे पैसे परत केले आहेत. वर्षा राऊत या ‘ठाकरे’ चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत.

आता वर्षा राऊत यांनी पाठवलेल्या कागदपत्रांची ईडीकडून तपासणी सुरू असून आवश्यकता भासल्यास त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!