---Advertisement---

हा तुमच्या बापाचा पैसा नाही ; रोहित पवारांनी अधिकाऱ्याला सुनावले खडेबोल ; व्हिडीओ व्हायरल !

By team
On: September 20, 2025 3:00 PM
Follow Us:
---Advertisement---

अहिल्यानगर : वृत्तसंस्था

सोशल मीडियावर आमदार रोहित पवारांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील आहे. जामखेड तालुक्यात शुक्रवारी आमसेभेचे आयोजन करण्यात आलं होतं. प्रशासनातील कामचुकारपणावर बोट ठेवत रोहित पवारांनी एका अधिकाऱ्याला फैलावर घेत थेट आमसभेत झापलं. नेमकं काय घडलं होतं,.

गेल्या काही महिन्यांपासून जामखेड नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या गटार योजनेत दर्जेदार काम होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. मात्र, प्रशानाकडून याची गंभीर दखल घेतली जात नव्हती. अखेर आमदार रोहित पवारांनी सभागृहातच अधिकाऱ्याला खडेबोल सुनावले. या आमसभेत नागरिकांनी तक्रारींचा पाढाच रोहित पवारांनी समोर वाचला.

यानंतर एक व्यक्तीने संबंधित कामाबाबत अधिकाऱ्याला जाब विचारत असताना रोहित पवार नागरिकांच्या प्रश्नावर समाधानकारण उतर मिळत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणी त्यांनी थेट अधिकाऱ्याला फैलावर घेत आतापर्यंत गोट्या खेळत होता का? तक्रार करणारे नागरिक बावळट आहेत का? तू मिजासखोर बनून अॅटीट्युड दाखवू नकोस. हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे, अशा कठोर शब्दांत अधिकाऱ्याला खडसावलं. या निमित्ताने त्यांचा पुन्हा एकदा आक्रमकपणा पाहायला मिळाला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!