---Advertisement---

गडकरींच्या मुलाच्या कंपनीचे शेअर्स गगनाला भिडले ; दररोज १४४ कोटींची कमाई : अंजली दमानियांचा गंभीर आरोप

By team
On: September 23, 2025 4:37 PM
Follow Us:
---Advertisement---

नागपूर : वृत्तसंस्था

पंतप्रधान मोदींच्या सरकारमधील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. गडकरींचे सुपुत्र निखिल गडकरी यांच्या मालकीची Cian Agro Industries & Infrastructure Ltd. या कंपनीचे शेअर्स गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढले असून, निखिल गडकरी दररोज तब्बल १४४ कोटी रुपयांनी श्रीमंत होत आहेत, असा दावा दमानिया यांनी केला आहे.

गडकरींच्या ‘बुद्धी’च्या विधानावर चिमटा

नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या “बुद्धीची किंमत महिन्याला २०० कोटी रुपये आहे” असे विधान केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना दमानिया म्हणाल्या, “गडकरी स्वतःला खूपच कमी लेखत आहेत. त्यांचा मुलगा दररोज १४४ कोटी रुपयांनी कमाई करत आहे.”

शेअर वाढीचे नेमके गणित काय?

दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, २५ जून २०२५ रोजी Cian Agro कंपनीत १,८९,३८,१२१ प्रमोटर शेअर्स होते. २१ सप्टेंबरला या शेअर्सच्या किंमतीत प्रत्येकी ₹७६ रुपयांची वाढ झाली. परिणामी एका दिवसात गडकरी कुटुंबीयांनी १४३.९२ कोटी रुपयांचा नफा कमावला, असा दावा करण्यात आला आहे.

‘सोन्याची खाण सापडली का?’ — दमानियांचा सवाल

दमानिया यांनी आणखी एक धक्कादायक दावा करत सांगितले की, जुलै २०२४ मध्ये Cian Agro चा शेअर केवळ ₹४२ होता. परंतु, फक्त एका वर्षात तो ₹७०१ वर पोहोचला. म्हणजेच जवळपास १६ पट वाढ झाली. ही वाढ ‘सामान्य बाजार प्रक्रियेचा’ परिणाम आहे की सत्ता वापरून घडवलेली योजना, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्याचबरोबर ही कंपनी इथेनॉल निर्मिती करते आणि केंद्र सरकारने लागू केलेल्या E20 (२०% इथेनॉल मिश्रण) धोरणाचा थेट फायदा निखिल गडकरी यांच्या कंपनीला होत असल्याचा आरोपही दमानियांनी केला आहे.

राजकीय सत्ता आणि व्यावसायिक फायदा?

दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकार इंधनात इथेनॉल मिश्रण वाढवून एकीकडे जनतेच्या गाड्यांचे मायलेज कमी करत आहे, तर दुसरीकडे गडकरींच्या मुलाच्या कंपनीला त्याचा आर्थिक फायदा मिळवून देत आहे. “हे धोरण जनतेसाठी की स्वतःच्या फायद्यासाठी?” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!