---Advertisement---

पंतप्रधानांचा फोटो व्हायरल केल्याचा राग ; काँग्रेस नेत्याला भाजप कार्यकर्त्यांनी साडी नेसवून अपमान

By team
On: September 23, 2025 4:53 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

कल्याण-डोंबिवलीतील मानपाडा परिसरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश पगारे यांना भाजप कार्यकर्त्यांनी भरचौकात साडी नेसवल्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसलेला फोटो प्रकाश पगारे यांनी सोशल मीडियावर शेअर केल्याचा राग मनात धरून भाजप कार्यकर्त्यांनी हे अपमानास्पद कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त करत संबंधित कार्यकर्त्यांविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी ही घटना अतिशय निंदनीय असल्याचे सांगत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्रकाश पगारे यांनीही प्रतिक्रिया देताना, “साडी नेसवा नाहीतर काही करा, पण मी काँग्रेससाठी शेवटपर्यंत लढणार,” असा इशारा दिला आहे.

दरम्यान, पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून संबंधितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे भाजप आणि काँग्रेस यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!