---Advertisement---

तुमच्याही पार्श्वभागाखाली अंधार आहे, कशाला काड्या करता?

By team
On: October 3, 2025 3:03 PM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

छत्रपती संभाजीनगर येथे प्रकृती बरी नसल्याने मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे हे उपचार घेत आहेत. राज्यात विविध दसरा मेळावे पार पडले. बीडमध्ये दोन दसरा मेळावे पार पडले. एक मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील नारायण गडावर तर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगाव येथील भगवान भक्तीगडावर पार पडला. दोन्ही मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. भगवान भक्तीगडावर मुंडे बहिण भाऊ अर्थात मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनजंय मुंडे दोघेही उपस्थित होते. या मेळाव्यातून धनंजय मुंडे यांनी एक मोठं विधान केलं. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, असं धनंजय मुंडे मेळाव्यात म्हणाले होते.

त्यांनी केलेल्या या विधानावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही कशाला बंजारा समाजातून आरक्षण घेतलं? तुम्ही तर त्यांच्यासारखे दिसतही नाहीत. असं जरांगे म्हणाले. तरीही म्हणायचं आम्ही तुमच्यासारखे दिसतो. कशाला त्यांचं घ्यायचं? तुमच्याही पार्श्वभागाखाली अंधार आहे, कशाला काड्या करता? असंही जरांगे म्हणाले.

पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर्सही झळकले होते. त्यावर ते धनंजय मुंडेंचं नाव न घेता जरांगे म्हणाले, चष्म्यावाला असले लोकं घेऊन येतो. त्यानेच हे पोस्टर्स आणायला लावले असतील. त्याचेच लोकं सभेत आराडओरड करत असतील, असा आरोप केला. बापाच्या कामाला डाग लागला पाहिजे, यासाठी चष्म्यावाला असे कामं करतो, असंही जरांगे म्हणाले. धनजंय मुंडे यांच्याबाबत केलेल्या प्रश्नावर मनोज जरांगे यांनी रक्ताने हात माखलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही. तुझ्यामुळे मी अजित पवारांचाही कार्यक्रम लावीन, असा इशारा दिला. शुक्रवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!