---Advertisement---

राधाकृष्ण विखे-पाटलांना धक्का; लोणी खुर्द ग्रामपंचायत हातातून गेली

On: January 18, 2021 3:03 PM
Follow Us:
---Advertisement---

अहमदनगर । अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निकाल समोर येत असून भाजपचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे-पाटील व राम शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे.  राधाकृष्ण विखे-पाटील यांना त्यांच्या मूळगावी मोठा धक्का बसला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी खूर्द गावातील 20 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. लोणी खूर्द गावामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांच्या समर्थकांच्या पॅनेलला अवघ्या 4 जागांवर विजय मिळाला आहे.

लोणी खुर्द गावात सत्तांतर

लोणी खुर्द हे राधाकृष्ण विखे-पाटलांचं गाव आहे. या गावात विखे पाटलांची 20 वर्षांपासून सत्ता होती. 17 पैकी 13 जागांवर परिवर्तन पॅनेलनं विजय मिळवल्यानं अवघ्या 4 जागांवर विखे पाटील समर्थकांचं पॅनेल विजयी झाले.

 जनार्दन घोगरे यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनल विजयी

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनेलला अवघ्या 4 जागांवर विजय मिळाला. जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन पॅनेलनं 17 पैकी 13 जागांवर विजय मिळवला आहे. लोणी खूर्दमधील संत्तांतर हे विखे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहता तालुक्यातील सहा ग्रामपंचयाती विखेंनी बिनविरोध केल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!