---Advertisement---

पोलिसाचा चार वेळा अत्याचार : महिला डॉक्टरने संपविले आयुष्य : संशयित आरोपी अटकेत !

By team
On: October 25, 2025 10:07 AM
Follow Us:
---Advertisement---

सातारा : वृत्तसंस्था

राज्यातील सातारा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. माझ्यावर चार वेळा अत्याचार करण्यात आले. माझा प्रचंड मानसिक छळ झाला. माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने असून त्याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला. प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, असे तळहातावरील सुसाइड नोटमध्ये लिहून फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने भाऊबीजेच्या दिवशी जीवन संपवले होते. या प्रकरणातील प्रशांत बनकरला आता पोलिसांनी अटक केली आहे. तर गोपाल बदनेचाही कसून शोध सुरु आहे.

या प्रकरणातील महिला डॉक्टर या बीड जिल्ह्यातील वडवणी येथील मूळ रहिवासी होत्या. त्यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने अद्यापही फरार आहेत. मूळ परळी येथील रहिवासी असलेल्या बदनेवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे. बनकर सामान्य नागरिक असल्याचा पोलिस अधिकाऱ्यांचा दावा आहे.

या प्रकरणात मुख्य आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी वेगवान तपास सुरू करत अनेक ठिकाणी छापे टाकले. प्रशांत बनकर फरार झाल्यानंतर तो आपल्या एका मित्राच्या फार्महाऊसमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सातारा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री सापळा रचून पहाटे चारच्या सुमारास पुणे परिसरात ही कारवाई केली. पोलिसांनी फार्महाऊसला वेढा घालून त्याला बेड्या ठोकल्या. अटकेनंतर बनकरला फलटण शहर पोलिस ठाण्यात आणण्यात येणार असून, त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, दुसरा आरोपी जो पोलिस असल्याचे सांगितले जाते, तो अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. प्रशांत बनकरला अटक झाल्याने या प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही अविवाहित महिला डॉक्टर दोन वर्षांपासून फलटण येथे कार्यरत होती. गेल्या काही महिन्यांपासून ती पोलिस आणि आरोग्य विभागाच्या वादात भरडली जात होती. कारण वैद्यकीय तपासणी अहवालाविषयीच्या वादातून तिची चौकशी सुरु होती. त्यामुळे ती खूप मानसिक तणावात होती. तिने वारंवार वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केली होती. माझ्यावर अन्याय होत आहे. मी आयुष्याची अखेर करेन, असे ती वारंवार म्हणत होती. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर तिने नामांकित हॉटेलात गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा अखेर केला. त्या फलटण शहरातील विद्यानगर परिसरात पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!