ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तूर्त दिलासा : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

देशभरात नेहमी प्रमाणे नोव्हेंबर महिन्यात अनेक छोटे मोठे बदल होत असताना आता व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत ही कपात केली आहे, तर १४.२ किलोग्रॅमच्या घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या बदलांमुळे ही दर कपात करण्यात आली आहे.

19 किलो वजनाच्या कॉमर्शियल (व्यावसायिक) एलपीजी सिलिंडरच्या दरात 5 रूपये कपात करण्यात आली आहे. त्यानुसार व्यावसियाक गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये आता 1590.50 रुपये इतकी झाली आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहे. त्याआधी एक ऑक्टोबर रोजी व्यावसाकिय गॅस सिलिंडरच्या दरात 15.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

सध्याची किंमत – सरकारी कंपनी इंडियन ऑयलच्या (IOC) संकेतस्थळानुसार, 19 किलो वजनाच्या सिलिंडरच्या किंमतीत ५ रूपयांनी कपात करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये सिलिंडरची किंमत 1590.50 रुपये इतकी झाली आहे. याआधी ही किंमत 1595.50 रुपये इतकी होती.

तर कोलकातामध्ये १९ किलोच्या सिलिंडरची किंमत आता १६९४.०० रुपये झाली आहे. मुंबईत आता ते १५४२.०० रुपये, तर चेन्नईमध्ये ते १७५०.०० रुपये इतकी किंमत झाली आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर १५.५० रुपयांनी महागला होता. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही कपात अथवा वाढ झालेली नाही. १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये ८५३ रूपये इतकीच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!