---Advertisement---

मोठी बातमी : बॉलिवूडचा ‘हिरो नंबर वन’ गोविंदा रुग्णालयात दाखल !

By team
On: November 12, 2025 10:26 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : प्रतिनिधी

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना जुहू येथील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. मंगळवार रात्री गोविंदा अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांना घरीच प्राथमिक उपचार देण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने रात्री १ वाजता त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले, अशी माहिती त्यांचे जवळचे मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल यांनी दिली.

रुग्णालयातील डॉक्टर डॉ. नामजोशी यांनी सांगितले की, “गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर आहे. तो आपल्या रूममध्ये विश्रांती घेत आहे. त्याच्या काही वैद्यकीय चाचण्या सुरू असून अहवाल आल्यानंतर पुढील उपचार ठरवले जातील. काळजी करण्यासारखी कोणतीही बाब नाही.” ललित बिंदल यांनी सांगितले की, सुरुवातीला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करण्यात आले, परंतु प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना स्वतः रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला.

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच गोविंदा स्वतः कार चालवत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असलेल्या ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी गेले होते. त्या भेटीनंतर त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याची चर्चा सुरू आहे. गोविंदाला यापूर्वीही वर्षभरापूर्वी पायाला झालेल्या अपघातामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या पायात किरकोळ जखम झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

दरम्यान, गोविंदा गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. काही काळापूर्वी त्यांची पत्नी सुनीता अहुजा यांनी घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केल्याची चर्चा झाली होती. मात्र, नंतर तिने तो अर्ज मागे घेतल्याचे तिच्या वकिलांनी स्पष्ट केले होते. सध्या गोविंदा रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून, पुढील एक-दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!