अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विद्यार्थी गुणवत्ता शोध स्पर्धेत समूह गीतगायन प्रकारात शिरवळ येथील जि. प. प्राथमिक मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘या देशाचा उन्नत माथा’ या समूहगीतास प्रथम क्रमांक मिळाला.या उज्जवल यशात वैभवी स्वामी,प्रतीक्षा स्वामी,नंदिनी कोळी,सृष्टी कोकरे,शिवानी बिराजदार,तृप्ती देवकर,प्रियंका दुधभाते, भक्ती इंगळे,श्रद्धा इंगळे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ समूहगीत गायन सादर केले.
तसेच वक्तृत्व स्पर्धा लहान गटात आराध्या शिवनाथ लोमटे हिने तालुकास्तरीय स्पर्धेत “विद्यार्थी कसा असावा” या विषयावर जबरदस्त भाषण करून उपस्थितांची मने जिंकत प्रथम क्रमांक मिळविला.शिरवळ शाळेचे समूहगीत गायन आणि वक्तृत्व सादर केलेल्या विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
समूहगीत गायन स्पर्धा लहान गटातही शाळेने तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.लोकनृत्य स्पर्धा प्रकारातही केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून तालुकास्तरीय स्पर्धेतही चांगले यश मिळविले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना सुनीता किरनळळी,प्रेमा कोणजी,रोहिणी बिराजदार, कल्पना मोरे,दयानंद चव्हाण,राजकुमार कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.या उज्ज्वल यशाबद्दल विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षणविस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी, लकप्पा पुजारी,केंद्रप्रमुख देविदास वाघमोडे,विषयतज्ज्ञ गणेश अंबुरे,केंद्रीय मुख्याध्यापक तोरप्पा चव्हाण,मुख्याध्यापक नागनाथ मिरजे, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थांनी अभिनंदन केले.