---Advertisement---

थंडी वाढताच हळदीच्या भाजीला मोठी मागणी; बाजारात ग्राहकांची गर्दी

By team
On: November 16, 2025 3:04 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

थंडीची चाहूल लागताच बाजारपेठेत हंगामी भाज्यांची लगबग वाढली असून, राजस्थानातील पारंपरिक हळदीची भाजी आता डोंबिवलीतही लोकप्रिय ठरत आहे. शरीराला उष्णता देणारे आणि औषधी गुणधर्मांनी भरलेले हळदीचे कंद हिवाळ्यात विशेष पसंत केले जातात. राजस्थानात लग्नसमारंभांसह विविध प्रसंगी पारंपरिकरीत्या केली जाणारी ही भाजी आता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचू लागली आहे.

सध्या बाजारात हळदीची भाजी २०० रुपये किलो या दराने उपलब्ध आहे. डोंबिवलीतील भाजी विक्रेत्या आशा घोलाप म्हणाल्या, “सध्या डोंबिवलीत या भाजीस २०० रुपये प्रति किलो दर असून, महाराष्ट्रीय तसेच इतर भागातील लोकांची मोठी मागणी आहे. गेल्या पंधरवड्यात बाजारात आलेल्या या भाजीची किंमत पुढील दिवसांत वाढू शकते.”

हळदीमध्ये दाह कमी करणारे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे करक्युमिनसारखे घटक मोठ्या प्रमाणात असल्याने थंडीच्या काळात तिचे सेवन आरोग्यवर्धक मानले जाते. त्यामुळे चव आणि आरोग्याचा उत्तम समतोल साधणारी हळदीची भाजी यंदा डोंबिवलीतील बाजारपेठेची खास आकर्षण ठरत आहे. वाढती गर्दी पाहता या हंगामात ‘हळदीची भाजी’ हिवाळ्याची खास चव ठरण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!