---Advertisement---

सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी महागली ! जाणून घ्या नवा दर

On: January 19, 2021 5:19 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सोन्याचा भाव १४० रुपयांवर वधारला असून तो ४९ हजारांवर गेला आहे. चांदीमध्ये देखील तेजी आहे. चांदीमध्ये आज ४७० रुपयांची वाढ झाली आहे.

 

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ४९०३४ रुपये आहे. त्यात १४० रुपयांची वाढ झाली आहे. चांदीमध्ये ४७० रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६५९०० रुपये आहे. याआधी सोमवारच्या सत्रात सोने आणि चांदी महागले होते. शुक्रवारी सोने दरात ५१९ रुपयांची घसरण झाली होती. तर चांदीचा भाव ६४९८० रुपयांवर बंद झाला होता. चांदीमध्ये शुक्रवारी १७०३ रुपयांची घसरण पाहायला मिळाली.

 

एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव ११७ रुपयांनी वधारला होता. सोने ४८३३२ रुपयांवर गेले. चांदीमध्ये ५४१ रुपयांची वाढ झाली आणि चांदीचा एक किलोचा भाव ६४६५७ रुपये झाला होता.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!