ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जोजन यांचा वाढदिवसानिमित्त आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते सत्कार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते तथा भाजप महाराष्ट्र राज्य परिषदेचे सदस्य शिवशरण जोजन यांचा वाढदिवसानिमित्त आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते गुरुवारी सत्कार करण्यात आला. त्यानिमित्त अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधी मठ व शहर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला.

१९९० पासून भाजपमध्ये सक्रिय असलेल्या जोजन यांनी गेली तीन दशके विविध पदांवर काम करत निष्ठा आणि कार्यक्षमतेचा आदर्श घालून दिला आहे. १९९५ ते १९९८ या काळात शहर मंडल चिटणीस, त्यानंतर १९९८ ते २००३ उपाध्यक्ष, २०१२ ते २०१५ जिल्हा कार्यकारिणी सदस्य, २०१५ ते २०१९ मंडल सरचिटणीस, तर २०२० ते २०२४ दरम्यान अक्कलकोट शहर मंडल अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. २००१ ते २००६ दरम्यान स्वीकृत नगरसेवक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. भाजपचे आमदार स्व. बाबासाहेब तानवडे व जेष्ठ नेते स्व.पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्याबरोबर त्यांनी दीर्घ काळ काम केले आहे.

याबद्दल त्यांना वाढदिवसानिमित्त आमदार कल्याणशेट्टी यांनी शुभेच्छा देत सत्कार केला.यावेळी जोजन यांनी देखील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.यावेळी वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले,भाजप मंडळ अध्यक्ष प्रदीप पाटील, आप्पासाहेब पाटील, प्रभाकर मजगे, महेश हिंडोळे,यशवंत धोंगडे आदिंसह प्रवीण शहा,अविनाश मडीखांबे, उत्तम गायकवाड,प्रथमेश जोजन, नन्नूभाई कोरबू, नवीद डांगे, सद्दाम शेरीकर, शिवराज स्वामी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!