---Advertisement---

बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्विट करत फडणवीसांनी शिवसेनेला स्वाभिमानावरून पुन्हा डिवचलं

On: January 23, 2021 1:06 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई | राज्यात उदयास आलेल्या महाविकास आघाडीमुळे भाजपाला सर्वाधिक आमदार असूनही सत्तेपासून दूर राहावं लागलं. त्यामुळे शिवसेनेनं केलेल्या राजकीय खेळीमुळे राज्यात नवं राजकारण बघायला मिळालं. यानंतर भाजपकडून रोज शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं जात. आता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे.  फडणवीस यांनी एक व्हिडीओतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. या व्हिडीओतूनच शिवसेनेला स्वाभिमानावरुन डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.


दरम्यान, आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. मूल्यांशी तडजोड करण्याचा प्रश्न आला तेव्हा बाळासाहेब आपल्या ध्येयापासून कधीच ढळले नाहीत. त्यांनी लोकांसाठी अविरतपणे काम केले, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!