ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात ५३०० पदांच्या पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात ; गृहमंत्री अनिल देशमुखांची घोषणा

नागपूर । सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असली तरी राज्यात पोलीस भरती होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. पोलीस भरती प्रक्रियेत कोणताही अडथळा नसून पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली असल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. ते शनिवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

मराठा आरक्षणामुळे पोलीस भरती प्रक्रियेला थोडा विलंब झाला. पण, याबाबत आम्ही मराठा नेत्यांशी चर्चा असून त्यांना राज्यात पोलीस भरती होणे आवश्यक असल्याचे सांगितले. ही गोष्ट त्यांनाही पटल्यामुळे मराठा नेत्यांनी पोलीस भरती प्रक्रियेला सहमती दर्शविली दिली आहे. त्यामुळे आता पोलीस भरतीची पुढील प्रक्रिया योग्यरित्या पार पडेल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

 

याचबरोबर, पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर उर्वरित जागांची भरती दुसऱ्या टप्प्यात होईल, असे अनिल देशमुख म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी 2538 जागांची  भरती झाल्यानंतर पुन्हा गरज पडल्यास आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!