मैंदर्गी नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवकपदी सिद्धाराम जकापुरे व जाफर बेपारी यांची बिनविरोध निवड; १२ तारखेला प्रक्रिया पूर्ण
उपनगराध्यक्ष पदासाठी सुरेखा होळीकट्टी व सुरेश नागूर यांची नावे चर्चेत
मैंदर्गी प्रतिनिधी : मैंदर्गी नगरपरिषदेत भारतीय जनता पार्टीकडून स्वीकृत नगरसेवक सदस्यपदी सिद्धाराम जकापुरे आणि जाफर बेपारी यांची बिनविरोध निवड झाली आहे. नगरपरिषदेच्या नियमानुसार ही निवड प्रक्रिया पार पडली असून, १२ जानेवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत अंतिम प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्या सभेत संबंधित ठरावांना अधिकृत मान्यता देऊन नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक कार्यभार स्वीकारतील.
दरम्यान, नगरपरिषदेत होणाऱ्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर सुरेखा होळीकट्टी आणि सुरेश नागूर यांची नावे चर्चेत असल्याची माहिती आहे. येत्या विशेष सभेत उपनगराध्यक्ष पदाची निवड होणार असून, अंतिम निर्णय त्या दिवशी स्पष्ट होणार आहे. या निवडींमुळे नगरपरिषदेतील प्रशासकीय रचना पूर्ण होणार असून, पुढील काळातील विकासकामे आणि निर्णय प्रक्रियेवर त्याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.