ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुरनूरमध्ये तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा भरली दहावीची शाळा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

येथील नागनाथ प्रशालेमध्ये तब्बल २८ वर्षांनंतर दहावीचा वर्ग पुन्हा भरल्याचा आगळावेगळा अनुभव माजी विद्यार्थ्यांनी घेतला. १९९६-९७ मधील दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि शाळेतील स्वर्गवासी झालेल्या शिक्षक आणि विद्यार्थी यांना अभिवादन करुन करण्यात आले. मुख्याध्यापक महादेव माने यांनी शाळेच्या प्रांगणात सर्वांचे गुलाबाचे फूल देऊन सर्वांचे स्वागत केले. विशेष म्हणजे, माजी विद्यार्थ्यांनी प्रार्थना, राष्ट्रगीत आणि परिपाठ सादर करून पुन्हा एकदा शालेय शिस्तीचा अनुभव घेतला.आठवणींना उजाळा: माजी विद्यार्थ्यांनी वर्गखोलीतील गमती-जमती, शिक्षकांचे प्रेम आणि कठोर शिस्त याबद्दल गप्पा मारल्या… ‘छडी लागे छमछम…’ म्हणत शिक्षकांकडून प्रेमाने छडीचा मार खाऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्वागत केले. शिक्षक सन्मान: ज्यांनी आयुष्याला दिशा दिली, त्या गुरुजनांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

स्नेहमेळाव्याचे औचित्य साधून या माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून शाळेला बेंच स्नेहभेट म्हणून दिले. सोलापूर जिल्हा घडामोडी प्रमुख विवेक शेकापूरे यांनी प्रास्ताविक केले, तर अर्जुन काळे यांनी कार्यक्रमाची रुपरेषा मांडली  यावेळी बापुसाहेब शिंदे, रवि सलगरे, खंडोबा सुरवसे , ईश्वर सूर्यवंशी ,किरण गुंजकर, कल्पना सुरवसे ,बेबीनंदा बेडगे , जयश्री सुरवसे, आदम पठाण , यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी मुख्याध्यापक महादेव माने. , माजी शिक्षक हरिदास जाजनुरे , सुरेश माने, स्वामीराव सुरवसे, परशुराम बेडगे, मदार शेख, विक्रम बेडगे , नारायण बागल यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.शिक्षकांनी सर्व विद्याथ्यर्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिले. शेकापूरे यांनी सूत्रसंचालन केले, तर बापूसाहेब शिंदे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!