---Advertisement---

मुंबई लोकल सेवा सुरु करण्याबाबत रेल्वेने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

On: January 27, 2021 11:13 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या ११ महिन्यापासून मुंबई लोकल सेवा बंद आहे. अनलॉकिंग झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. पण सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश मिळत नसल्याने, सर्वसामन्य मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान, लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी कधी सुरु करणार? असा प्रश्न सातत्याने उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, अशातच मुंबई लोकल रेल्वे सेवा लवकरच सुरु करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरिता नेहमीप्रमाणे सरसकट सर्वांना एकाच वेळी रेल्वे गाडय़ांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशी चर्चा यावेळी झाली.

यादरम्यान मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत २९ जानेवारीपासून अतिरिक्त २०४ लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सध्या सुरु असलेल्या लोकल फेऱ्यांची संख्या २७८१ वरुन २८९५ वर पोहोचणार आहे. मध्य रेल्वेने लोकल फेऱ्यांची संख्या १५८० वरुन १६८५ तर पश्चिम रेल्वेने १२०१ वरुन १३०० वर नेण्याचा निर्णय घेतला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!