---Advertisement---

लोकमंगल फाउंडेशनतर्फे 24 विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसाहाय्य

On: January 27, 2021 4:43 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर (प्रतिनिधी) : लोकमंगल फाउंडेशन संचालित लोटस या शैक्षणिक अर्थसहाय्य करणाऱ्या विभागामार्फत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 24 विद्यार्थांना शैक्षणिक अर्थसाहाय्य देण्यात आले. त्याच्या धनादेशाचे वाटप आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी आ. देशमुख  यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी व भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही होतकरू विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत लोटसतर्फे शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेऊन स्वतःच्या भविष्यासोबतच देशाचे जबाबदार नागरिक व्हावे, असे आवाहन केले. यावेळी मल्लिकार्जुन अक्कलवाडे,  व्ही.पी. मोरे यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!