---Advertisement---

नांदेडमध्ये रोहित शर्मा व धवल कुलकर्णी उभारणार क्रिकेट अकादमी!

On: February 2, 2021 11:02 AM
Follow Us:
---Advertisement---

नांदेड : नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास प्रसिद्ध क्रिकेटपटू रोहित शर्मा व धवल कुलकर्णी इच्छुक असून, धवल कुलकर्णीने यासंदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली.

धवल कुलकर्णी व ‘क्रिककिंगडम’चे पराग दहिवल यांनी सोमवारी सायंकाळी मुंबईमध्ये या भेटीत या संकल्पनेवर अशोक चव्हाण यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. अनेक प्रतिभावान खेळाडू नांदेडमध्ये असून, ही अकादमी सुरू झाल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीचे दर्जेदार प्रशिक्षण मिळेल, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

धवल कुलकर्णीने यावेळी अकादमीसंदर्भात विस्तृत माहिती दिली व नांदेड शहरात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली. अशोक चव्हाण यांना एक टी-शर्ट भेट दिला. या अकादमीच्या उभारणीची चर्चा करण्यासाठी पुढील बैठक लवकरच होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!